राहुरी वेब प्रतिनिधी,२६ (शरद पाचारणे)-
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडे बाजार, बसस्टॅन्ड इतर गर्दिच्या ठिकाणाहुन गहाळ झालेले मोबाईल फोनची गहाळ रजिस्टरला नोंद घेवून अधिकचा तपास करण्यासाठी सदर मोबाईल बाबत अधिक माहिती संकलीत करुन नगर उत्तर सेल पोलीस स्टेशन येथे पाठविण्यात आले वरील गहाळ झालेल्या मोबाईलचा अधिक तपास करुन गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेवुन आज दिनांक २६/०९/२०२४ रोजी गहाळ झालेल्या मोबाईलची खात्री करुन डॉ. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते विविध कंपन्यांचे एकुण २३ मोबाईल फोन एकुण किंमत २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमालाचा शोध घेवून मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग मार्गदर्शनाखाली श्री संजय.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन व त्यांच्या टीमने केले