राहुरी नगरपरिषदेद्वारे पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धाचे आयोजन

राहुरी वेब प्रतिनिधी ७ ( शरद पाचारणे ) –
सार्वजनिक गणेशोत्सव निमीत्त राहुरी नगरपरिषदेने पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, नियम व अटी पुढीलप्रमाणे 1. ‘श्री’ची मुर्ती ही 100% मातीची किंवा शाडू मातीची असावी. 2. गणपती सजावटीसाठी वापरण्यात आलेले साहेत्य हे पर्यावरणपुरक असावे. 3. गणेशोत्सव काळात तयार होणारे निर्माल्याचे कंपोस्टिंग पद्धतीने खतनिर्मिती करावी, सदर मंडळाने ध्वनी प्रदुषण करणा-या साधनांचा वापर करू नये.4.प्रत्येक मंडळाने सामाजिक संदेश असेलले देखावे (उदा.स्री-जन्माचे स्वागत पर्यावरण संवर्धन व संरक्षण,हरित राहुरी शहर,Climate Change,पुनर्वापर (Reuse,Reduce,Recycle,).5.प्रत्येक मंडळाने गणेशोत्सव काळात देशी/स्थानिक प्रजातींचे 25-50 वृक्ष लागवड करावे 6.सदर बाबींचा 30 सेकंदाचा व्हिडिओ राहुरी नगरपरिषदेच्या [email protected] या मेल पाठवण्यात यावा,यावर मंडळाचे नाव लिहावे, तसेच सोबत पुरावासाठी, जिओटॅग फोटो,वेगवेगळ्या चार बाजूने चार फोटो काढावेत, तसेच फेसबुक पेज https://www.facebook.com/majhirahuri ला tag करावे. 7.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत हरित शपथ घेतले बाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (https://majhivasundhara.in/en/lets-pledge या लिंक वर क्लिक करुन हरित शपथ घ्यावी.)
• सदरील स्पर्धा ही राहुरी नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आहे. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सदरील स्पर्धेचा कालावधी दि.07.09.2024 ते दि. 16.09.2024 असा असेल.
• सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी राहुरी शहरातील सार्वजनिक मंडळानी नोंदणीसाठी नगरपरिषद नगरपरिषद आरोग्य विभागात संपर्क करावा.
• नोंदणी केल्यावर नगरपरिषदेच्या पाहणी पथकाद्वारे पाहणी करण्यात येईल,या पाहणी पथकात,पत्रकार,सामजिक कार्यकर्ते,प्रशासकीय अधिकारी, रा.न.प.अभियंता यांची समिती असेल.
• परीक्षकांचा व नगरपरिषद प्रशासनाचा प्रतिसाद अंतिम राहील.
• स्पर्धेत निवड झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांना पर्यावरणपुरक गणेश मुर्ती, पर्यावरण पुरक सजावट, मुर्ती विसर्जन व रोप लागवड याआधारे
“ पर्यावरण स्नेही गणेश भक्त ‘पुरस्कार देण्यात येईल. तसेच प्रथम तीन विजेत्यांना खालिलप्रमाणे पारितोषिक देणेत येईल.
प्रथम पारितोषिक – रु. 11,111/- व ट्रॉफी व सन्मानपत्र,द्वितीय पारितोषिक –रु. 7,111/- व ट्रॉफी व सन्मानपत्र,तृतीयपारितोषिक – रु. 3,111/- व ट्रॉफी व सन्मानपत्रतसेच असे एकूण रु.21000 चे बक्षीस ठेवले आहे, सर्व सहभागीं मंडळांना सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेतलेबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी सर्व पर्यावरणप्रेमी गणेश भक्तांनी सदर स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *