राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे) : शिवजयंतीच्या निमित्ताने शिव प्रतिष्ठान तसेच शिवांकुर फाउंडेशन आणि डॉ. पवार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिवांकुर हायट्स, क्रांती चौक, राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदात्यांची नोंदणी हॉस्पिटलमार्फत करण्यात येणार आहे. “रक्तदान ही जनसामान्यांची सेवा, यालाच मानूया ईश्वरसेवा” या संदेशातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
डॉ. पवार हॉस्पिटल हे बहुविशेषज्ञ (मल्टी स्पेशालिटी) रुग्णालय असून बालरोग, सर्जरी, स्त्रीरोग व प्रसूती, कान-नाक-घसा तसेच दंतरोग विभागाच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. शिवजयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये, हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.