समाजोपयोगी उपक्रमांनी मनसेकडून शिवजयंती उत्साहात

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे:

महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी शहर व तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा आश्रम येथे झालेल्या या कार्यक्रमाला मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती लाभली. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य, गोशाळेत चारा वाटप जयंतीनिमित्त आश्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच गोशाळेत जनावरांसाठी चारा देत पशुसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमादरम्यान कर्कश डीजे साऊंड सिस्टीमला फाटा देत जयंती साधेपणाने व शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. सामाजिक उपक्रमांद्वारे जयंती साजरी करण्याचा आदर्श संदेश मनसेच्या वतीने देण्यात आला. आश्रमातील शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला व विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, देसवंडीचे सामाजिक कार्यकर्ते नितीन (आप्पा) कल्हापुरे, शहराध्यक्ष प्रतिक विधाते, उपतालुकाध्यक्ष राहुल पिले, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, विद्यार्थी सेना जिल्हा संघटक सागर माने, तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे, शहराध्यक्ष संदेश गायकवाड, सचिव युवराज कोकाटे, महेश (जालु) घाडगे, अमर देठे आदी उपस्थित होते.तसेच राहुरी कृषी बाजार समिती सभापती अरुणसाहेब तनपुरे, तहसीलदार अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, निबंधक खेडकर, बांधकाम विभागाचे सय्यद सर, कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, आरोग्य अधिकारी दिपाली गायकवाड, महावितरण प्रमुख बारसे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.सामाजिक उपक्रमांमुळे शिवजयंती कार्यक्रमाला आगळेवेगळे व समाजोपयोगी स्वरूप प्राप्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *