मुळा नदीतील वाळूचोरी प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे )– राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्रातून वाळू चोरी केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी वाहन चालक व वाहन मालक यांची राहुरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.राहुरी शहरालगत नगर–मनमाड महामार्गावरील संत गाडगेबाबा आश्रम शाळेसमोरील परिसरात ११ एप्रिल २०१९ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास विनापरवाना वाळू उपसा करून तिची वाहतूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून वाहनासह आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.राहुरी येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायमूर्ती आदित्य शिंदे साहेब यांच्यासमोर खटला चालला. सरकार पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांची व साक्षीदारांची छाननी केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना संशयाचा फायदा देत महंमद हुसेन शेख व युनूस निसार शेख यांची निर्दोष मुक्तता केली.आरोपींच्या वतीने अॅड. प्रकाश संसार यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संबंधितांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *