हर्षदादा तनपुरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत ७८ मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) :
हर्षदादा तनपुरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत ७८ मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) :
प्रधानमंत्री आवास योजना २.० वैयक्तिक घरकुल (BLC) घटक क्रमांक १ अंतर्गत राहुरी नगरपरिषद हद्दीतील एकूण ७८ लाभार्थ्यांची घरकुले मंजूर करण्यात आली असून मंजूर लाभार्थ्यांना नगरपरिषदेचे गटनेते हर्षदादा तनपुरे यांच्या हस्ते घरकुल मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) रोजी नगरपालिका सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी मिळावी यासाठी नगरपरिषदेकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली.
तनपुरे यांनी सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करून नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मुख्याधिकारी अभिजित हराळे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई यांच्यासह नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *