चोथे वस्तीवर साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात 

राहुरी फॅक्टरी –

राहुरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथे वेदमंत्रांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शुक्रवारी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे तसेच चोथे वस्ती परिसरातील भाविकांनी संकल्प केलेल्या साई मंदिराचे काम पूर्णत्वास आले असून त्यानिमित्ताने प्राणप्रतिष्ठा सोहळा आनंदात पार पडला. वेदशास्त्र संपन्न प्रकाश नवले गुरु कणगर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल कुलकर्णी, राजेंद्र देशपांडे, विश्वास क्षीरसागर व मंगेश कुलकर्णी यांच्या वेदमंत्रांच्या गजरात पूजा विधीवत पार पडली.  यावेळी बोलताना त्यांनी साईबाबा हे श्रद्धा आणि सबुरीचे प्रतीक असल्याचे सांगत, त्यांच्या आशीर्वादाने समाजात सद्भावना, सेवा आणि आध्यात्मिक उन्नती घडते, असे प्रतिपादन केले. साई मंदिर हे केवळ पूजा-अर्चेचे स्थान नसून समाजाला एकत्र आणणारे व संस्कार देणारे केंद्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. साईबाबांच्या कृपेने येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांती व समाधान लाभावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष सुरेश वाबळे, कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर कोळसे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नेते सीताराम ढुस, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. सुधाकर कदम, व्हा. चेअरमन आबासाहेब वाळुंज, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, बाबा महाराज मोरे, बाबासाहेब महाराज वाळुंज, माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे, क्रांती ज्योती पतसंस्थेचे चेअरमन जे. के. निमसे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, प्रा. सतिष राऊत, नगरसेवक शरद वाळुंज, माजी नगरसेवक बाळासाहेब खुरुद, डॉ. संदीप मुसमाडे, शिवाजी मुसमाडे, प्रकाश सोनी, भाऊसाहेब वाळुंज, मारुती खरात, भाऊ गुंजाळ, वैभव गिरमे, रामेश्वर तोडमल, किशोर थोरात, भास्कर कोळसे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोथे वस्ती परिसरातील साई भक्तांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *