वरवंडी व इतर दहा गावे पाणीपुरवठा योजना समितीच्या अध्यक्षपदी सौ.अलकाताई माने यांची निवड

राहुरी वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे – राहुरी व नगर तालुक्यातील गावांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वरवंडी व इतर दहा गावे पाणीपुरवठा योजना समितीच्या अध्यक्षपदी धामोरी बु.च्या सरपंच सौ. अलकाताई रामदास माने यांची तर उपाध्यक्षपदी नांदगावचे सरपंच सखाराम मालू सरक यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

         राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी गावातील सरपंच सदस्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी सदर निवडी जाहीर करण्यात आल्या. सचिव पदी ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड यांची निवड करण्यात आली. यावेळी समितीमध्ये सदस्य म्हणून लाभार्थी गावातील सरपंच सर्वश्री कैलास दिलीप पवार, सौ. मुक्ताबाई गोरक्षनाथ गिऱ्हे, भाऊसाहेब कोळेकर, अण्णासाहेब माळी, सौ. जिजाबाई दत्तात्रय काळे यांची निवड करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये वरवंडी सह बाभूळगाव, धामोरी बु., धामोरी खुर्द, खडांबे बु., खडांबे खुर्द, नांदगाव, देहरे व शिंगवे नाईक आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी रामदास माने, गोरक्षनाथ गिऱ्हे, धनंजय बरकडे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे, मुक्ताजी तांबे, भास्कर माने, अशोक पटारे, दत्तात्रय माने, राजेंद्र माने, भाऊसाहेब माने, तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल गिऱ्हे, उपसरपंच हिराचंद गिऱ्हे, चांगदेव पटारे, बाळासाहेब कुसमुडे, जगदीश उगले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता सुनील हरदास, उपअभियंता सुरेश गायकवाड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जायभाय, शाखा अभियंता परदेशी, विस्तार अधिकारी माळी, वरिष्ठ सहाय्यक रवींद्र मांडे आदी यावेळी उपस्थित होते. पाणीपुरवठा योजना समितीच्या नूतन अध्यक्ष सौ अलकाताई माने तसेच सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाषराव पाटील, माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील आदींसह भाजपा व युतीचे पदाधिकारी तसेच लाभार्थी गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *