राहुरी वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे –
राहुरी येथील ‘लाइफ इन’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता २ डी इको व सोनोग्राफी सेंटरचा उद्घाटन समारंभ होणार आहे.हा कार्यक्रम शुभहस्ते श्री. अरुणसाहेब तनपुरे (मा. चेअरमन, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना, राहुरी) यांच्या हस्ते पार पडणार असून, मा. डॉ. उषाताई तनपुरे (माजी नगराध्यक्ष), मा. प्राजक्त दादा तनपुरे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. ताराचंद पाटील तनपुरे (माजी नगराध्यक्ष) व मा. भाऊसाहेब मोरे सर (नगराध्यक्ष, राहुरी नगर परिषद) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.हॉस्पिटलमध्ये डॉ. अक्षय खटके (MD मेडिसिन), डॉ. आशीष चौधरी (DNB कार्डिओलॉजिस्ट), डॉ. गजानंद वंगळ (MS जनरल सर्जन) व डॉ. प्रविण क्षीरसागर (DMRE रेडिओलॉजिस्ट) यांच्या माध्यमातून आधुनिक तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्राजक्त संदीप हिवाळे (मॅनेजिंग डायरेक्टर), डॉ. भरत पैठणे (CMO), श्रीमती रुपाली शेलके (Admin) व डॉ. धनंजय शिवाजीराव पानसंबळ (मॅनेजिंग डायरेक्टर – समाजभूषण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.नवीन २डी इको व सोनोग्राफी सेंटरमुळे राहुरी व परिसरातील नागरिकांना हृदय व इतर महत्त्वाच्या तपासण्यांसाठी अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असून, वेळ व खर्चाची बचत होणार आहे.समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. धनंजय पानसंबळ व ‘लाइफ इन’ परिवाराकडून करण्यात आले आहे.