गावकऱ्यांनीच पकडला  अवैध वाळूचा टेम्पो; नितीन कल्हापुरेची राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद

राहुरी वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे :-
देसवंडी (ता. राहुरी) येथे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच सरपंच पती नितीन कल्हापुरे व ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत एक टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी देसवंडी गावचे सरपंच पती  नितीन कल्हापुरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, 23 जानेवारी रोजी रात्री गावात वाळू चोरी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर सरपंच पती नितीन कल्हापुरे यांच्यासह ग्रामस्थांनी रात्रगस्त घालत शोध घेतला. गावातील एका दुकानाजवळ एक टेम्पो वाळू वाहतूक करताना आढळून आला. चालकाला विचारणा करताच तो पळून गेला.
त्यानंतर ग्रामस्थानी सदर  टेम्पो (MH-04 AL-9605) मध्ये अंदाजे दीड ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. सदर टेम्पो  नितीन कल्हापुरे  यांनी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी नितीन कल्हापुरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *