राहुरीत श्री. परशुराम केशवराव गिरगुणे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात साजरा होणार
राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) : येथील ज्येष्ठ नागरिक श्री. परशुराम केशवराव गिरगुणे यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राहुरी येथील पांडुरंग लॉन, स्टेशन रोड येथे होणार आहे.
दीर्घ आयुष्य, समाजसेवा व धार्मिक आचरणाने परिचित असलेल्या श्री. गिरगुणे यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिभावात साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी परिसरातील मान्यवर, आप्तेष्ट व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या सोहळ्यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, त्यानंतर सदिच्छा भेटी व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. सुधीर परशुराम गिरगुणे, डॉ. प्रताप परशुराम गिरगुणे व समस्त गिरगुणे परिवार यांच्या वतीने नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.