राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे) :
शिवांकुर विद्यालयाचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला असून परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राहिली आहे.
एलिमेंट्री ग्रेड परीक्षा २०२५ साठी एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये A श्रेणीत ४, B श्रेणीत ८ तर C श्रेणीत १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठीही २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये A श्रेणीत १, B श्रेणीत ५ तर C श्रेणीत २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती खडके मॅडम, मकासरे मॅडम व तारडे सर यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबळ, प्रियंका पांढरे, ज्योती शेळके, शितल फाटक, सुजाता तारडे, सुनीता ढोकणे, अनिता म्हसे, मोहिनी पेरणे, रोहिणी हापसे, सुरेखा मकासरे, सोनाली कुमावत, अनिता लांबे, दुर्गा बारवेकर तसेच लिपिक भाग्यश्री झांबरे व शिपाई शारदा तमनर यांच्यासह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.