तमनर आखाडा येथे२५वे आध्यात्मिक शिबिराचे आयोजन

राहुरी वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे :
तमनर आखाडा (ता. राहुरी) येथे तमनर आखाडा ग्रामस्थ व सत्संग मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले २५ वे आध्यात्मिक शिबिर बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ पासून रविवार दि. २५ जानेवारी २०२६ पर्यंत विविध आध्यात्मिक व वैचारिक उपक्रमांनी संपन्न होत आहे.
या शिबिरासाठी परम पूज्य सदगुरु समर्थ संत श्री सुमंतबापूजी हंबीर (अध्यक्ष, विश्वव्यापी मानवधर्म आश्रम, पाटोदा, ता. दौंड, जि. पुणे) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत. शिबिरात दररोज पहाटे ध्यानसाधना, नामस्मरण, प्रवचने, भजन, कीर्तन तसेच विविध संत-महात्म्यांची मार्गदर्शक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
शिबिराचा मुख्य उद्देश युवकांमध्ये सद्विचार, आत्मशुद्धी, व्यसनमुक्ती, सामाजिक बांधिलकी आणि मानसिक शांती यांचा प्रसार करणे हा आहे. परिसरातील भाविक व साधकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, दररोज सकाळी व सायंकाळी होणाऱ्या सत्रांना मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून येत आहे.
रविवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी विशेष नामस्मरण व समारोप समारंभ होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आध्यात्मिक शिबिरामुळे तमनर आखाडा परिसर भक्तिमय व शांततामय वातावरणाने भारावून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *