राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे) –
बारागाव नांदूर (ता. राहुरी) येथे ‘साई आदर्श को-ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा आराध्य दैवत कानिफनाथ महाराज यांच्या पावन भूमीत पार पडणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास महंत उद्धवजी महाराज मंडलिक (अध्यक्ष, नारायणगिरी आश्रम, सुरेगाव, ता. नेवासा) हे शुभहस्ते उद्घाटन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. सुरेशराव वाबळे (अध्यक्ष, मल्टिस्टेट फेडरेशन) राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. संजय ठेंगे (पोलीस निरीक्षक, राहुरी) हे उपस्थित राहणार आहेत.
बारागाव नांदूर बाजारतळ परिसरात सुरू होत असलेल्या या शाखेमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी, नोकरदार व सर्वसामान्य नागरिकांना विश्वासार्ह आर्थिक सेवा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. ठेवी, कर्जपुरवठा व इतर आर्थिक सुविधा अधिक सुलभ होणार असल्याने स्थानिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमास बारागाव नांदूर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक श्री. शिवाजीराव कपाळे (साई आदर्श परिवार) यांनी केले आहे.