राहुरी वेब प्रतिनिधी,(शरद पाचारणे ) :
जोगेश्वरी सेवा सेवा संस्थेच्या चेअरमन पदी प्रकाश नानासाहेब भुजाडी यांची बिनविरोध निवड झाली.
जोगेश्वरी सेवा संस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडीसाठी सहकार खात्यातील बाळासाहेब रासकर यांचे अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा संस्थेच्या कार्यालयात होऊन त्या मध्ये चेअरमन पदासाठी प्रकाश भुजाडी यांच्या नावाची सूचना सचिन निवृत्ती हारदे यांनी तर अनुमोदन संदीप बाबासाहेब भोंगळ यांनी दिले
चेअरमन पदासाठी एकच नाव आल्याने प्रकाश भुजाडी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी संस्थेच्या मावळत्या चेअरमन सौ पुष्पा पांडुरंग भुजाडी यांनी नूतन चेअरमन प्रकाश भुजाडी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष प्रदीप नानासाहेब भुजाडी, संचालक सचिन हारदे, संदीप भोंगळ,प्रशांत डोले,राजेंद्र काळे, सदाशिव गुंजाळ, रखमाजी घाडगे,संजय येवले,भगवान राजगुरू, दत्तात्रय तागड,सौ द्रौपदाबाई काळे, आदि संचालक उपस्थित होते.
अहिल्या नगर जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या जोगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाशराव नानासाहेब भुजाडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याप्रसंगी सत्कार करताना डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, श्रीराम गाडे,विजयराव डौले,ज्ञानदेव हारदे, मारोतीराव हारदे बाजार समितीचे माजी संचालक सुभाष डुक्रे,किशोर जाधव बाबासाहेब शेटे, वाय एस तनपुरे,उपस्थित होते.
फोटो