अहिल्यानगर विशेष प्रतिनिधी,२८ ( शरद पाचारणे ) : अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड येथे एका तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून नऊ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹१,५९,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक, ज्यात पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, हृदय घोडके, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत कुसळकर यांचा समावेश होता, जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती गोळा करत होते.
सोमवार दिनांक २८/०७/२०२५ रोजी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विजय जाधव नावाचा व्यक्ती तपनेश्वर गल्ली, जामखेड येथे तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत आणि खेळवत आहे. या माहितीच्या आधारे, पथकाने पंचासमक्ष तपनेश्वर गल्ली, जामखेड येथील नमूद ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी काही इसम भिंतीच्या आडोशाला तिरट जुगार खेळताना आढळले.
पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. नितीन आश्रुबा रोखडे (वय ५० वर्षे, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड)
२. जावेद इस्माईल बागवान (वय ४४ वर्षे, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड)
३. संतोष नवनाथ कदम (वय ४२ वर्षे, रा. कुसडगांव, ता. जामखेड)
४. नवनाथ सदाशिव जाधव (वय ३६ वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड)
५. विजय विनायक कळसकर (वय ५३ वर्षे, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड)
६. निलेश लक्ष्मण पेचे (वय ४० वर्षे, रा. पोकळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड)
७. जयसिंग विश्वनाथ ढोके (वय ४० वर्षे, रा. भुतवडा, ता. जामखेड)
८. विठ्ठल मोहन भोसले (वय ३८ वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, ता. जामखेड)
९. विजय गहिनीनाथ जाधव (वय ५३ वर्षे, रा. कर्जत रोड, जामखेड)
अटक केलेल्या आरोपींकडून रोख रक्कम, ८ मोबाईल फोन आणि १ मोटार सायकल असा एकूण ₹१,५९,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या आरोपींविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. ४२७/२०२५, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.