सहकारमहर्षी डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांना २७ व्या पुण्यस्मरण दिनी  “प्रेरणा परिवाराकडून” अभिवादन

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ):- सहकारमहर्षी तसेच राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांच्या २७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रेरणा मल्टीस्टेट लि. राहुरी शाखे ,राहुरी फॅक्टरी मध्ये त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या अभिवादन समारंभावेळी प्रेरणा अर्थ परिवाराचे संस्थापक सुरेशशेठ वाबळे, प्रेरणा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन प्रा. वेणुनाथ लांबे सर, संचालक श्री. रावसाहेब पा. शिंदे, प्रेरणा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. मच्छिंद्र पा. हुरुळे, आदर्श पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. आबासाहेब वाळूंज, मार्केट कमिटीचे संचालक श्री. रखमाजी पा. जाधव, श्री. अनिलशेठ सुराणा, श्री. भरत कर्जुले आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी प्रेरणा मल्टीस्टेटचे संचालक रवींद्र राऊत, प्रा. विशाल वाबळे, डॉ. मधुसूदन भागवत, रवींद्र दरक, ॲड. अमोल डौले, ॲड. किरण धोंडे, जनरल मॅनेजर अनिल वर्पे, शाखाधिकारी रवींद्र हिवाळे, सोमनाथ शिंदे, आप्पासाहेब आंबेकर, जगदीश लोखंडे, आप्पासाहेब गाढे, संदीप जाधव यांच्यासह प्रेरणा मल्टीस्टेटचे कर्मचारीही उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांच्या कार्याला आदराने स्मरण करत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *