राहुरीच्या दोन पोलिसांना “राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार २०२५” प्रदान

राहुरी वेब प्रतिनिधी,९ ( शरद पाचारणे ) :-  महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय प्रशासकीय सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने गरुड फाउंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार २०२५’ यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथील भूमिपुत्र तथा राहुरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री.अशोक छबाजी शिंदे तसेच पाथर्डी तालुक्यातील मढी येथील भूमिपुत्र तथा राहुरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्री. अजिनाथ महादेव पाखरे यांना प्रदान करण्यात आला.
गरुड फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘आयुष्यात गीत गाताना जगाला हेवा वाटावा, असे काहीतरी करून दाखवावं आणि आयुष्य फुलवून टाकावं’ या विचाराने प्रेरित होऊन,पोलीस हवालदार श्री.अशोक शिंदे श्री.अजिनाथ पाखरे यांनी पोलीस दलात कर्तव्यदक्षता आणि निष्ठेने सेवा बजावली आहे.
हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला, जिथे श्री.शिंदे व श्री.पाखरे यांना हा मानाचा आणि प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. गरुड फाउंडेशनच्या वतीने श्री. बाळकृष्ण धोडीराम भोसले (अखिलनगर जिल्हाध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ), श्री. आकाश महादेव पुजारी (संस्थापक अध्यक्ष, गरुड फाउंडेशन) आणि श्री. रमेश गंगधर खेमनर (आयोजक तथा कार्याध्यक्ष, गरुड फाउंडेशन) यांच्या तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारामुळे श्री.शिंदे व श्री. पाखरे यांच्या प्रशासकीय सेवेतील योगदानाला योग्य तो सन्मान मिळाला असून, त्यांचे हे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
गरुड फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष रमेश खेमनर, रामदास बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, रामचंद्र थोरात, रंगनाथ तमनर, पत्रकार अशोक मंडलिक, आर. आर. जाधव, जावेद शेख, सोमनाथ वाघ यांनी कार्यक्रम यशस्वीते आठी अथक परिश्रम घेतले.
श्री. अशोक शिंदे व श्री.अजिनाथ पाखरे यांना पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *