सीमा सुरक्षा दलाचे कमांडर साहेबराव चिमाजी धोत्रे यांचा यारी ग्रुपकडून सन्मान

राहुरी वेब प्रतिनिधी,(शरद पाचारणे ) : भारतभूमीच्या रक्षणासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या अतुलनीय कार्याला सलाम करण्यासाठी,राळेगण सिद्धीचे रहिवाशी व सध्या राहुरीत वास्तव्यास असलेले  सीमा सुरक्षा दलाचे (BSF) कमांडर (ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभाग ) साहेबराव चिमाजी धोत्रे यांचा सेवापूर्ती समारंभानिमित्त आज, मंगळवार, ३ जून रोजी दुपारी ३ वाजता शहरातील शनी चौक येथे “यारी ग्रुप” च्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. श्री. धोत्रे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सारख्या महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी,  राजेंद्र बोरकर, महेश पोपळघट, सुनील भोसले, पप्पू कोरडे, दिलीप गुंजाळ, संतोष जगधने, वसंतराव जगधने आणि लहू कोरडे यांच्यासह यारी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.राहुरीकरांनी ठिकठिकाणी हार, शाल, आणि बुके देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी उपस्थितांनी साहेबराव चिमाजी धोत्रे यांच्या भारतमातेच्या सेवेतील योगदानाला उजाळा दिला. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल आणि शौर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यारी ग्रुपने अशा प्रकारे निवृत्त सैनिकांचा सन्मान करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. हा सन्मान सोहळा, देशासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांप्रती समाजाची असलेली कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणारा एक महत्त्वाचा क्षण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *