राहुरी वेब प्रतिनिधी, २३ ( शरद पाचारणे )-
राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे कारखान्याशी संलग्न असलेल्या श्री. विवेकानंद नर्सिंग होम येथील अरेरावी व हुकूमशाही गाजविणाऱ्या आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य व सुरक्षा रक्षक यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथील मेस व्यावसायिक ओमकार कोबरणे यांनी माजी खा.सुजय विखे व राहुरीचे आ. शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
याबाबत माजी खा.विखे व आ. कर्डिले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी खासगी मेस असून महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी दररोज सुरू असते नियमित प्रमाणे बुधवारी सायंकाळच्या दरम्यान मेस वरील एक कर्मचारी महाविद्यालयाच्या गेट वर डबा देण्यासाठी गेला असता तेथे असलेला सुरक्षारक्षक अशपाक सय्यद हा अतिशय मद्यधुंद अवस्थेत आढळून आला व माझ्या असलेल्या कर्मचाऱ्यास दादागिरीची भाषा करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व येथे माझ्या परवानगीशिवाय कोणीही आत जाऊ शकत नाही कोणाला सांगायचे त्याला सांगा अशी दमबाजी करत मला देखील फोनवर अरेरावी केली त्या सुरक्षारक्षक ड्युटीवर असून देखील अतिशय मद्यधंद अवस्थेत तो त्या ठिकाणी होता,.
तदनंतर मी याची तक्रार करण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य अनंतकुमार शेकोकर व फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब शिरसकर यांना फोन द्वारे संपर्क साधला असता प्राचार्य अनंतकुमार शेकोकर यांनी तू पेपरला बातमी दे,तूच तुझ्या पद्धतीने काहीतरी कर असे म्हणत उडवा-उडवीची उत्तरे दिली तर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब शिरसकर यांनी तू मला फोनच कशाला केला तू काय मला धमकी देतो का असे म्हणत उडवाउडवीची उत्तर देत फोन ठेवून दिला.तरी विवेकानंद नर्सिंग होममधील या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.