राहुरी वेब प्रतिनिधी,१५ ( शरद पाचारणे ) –
राहुरी तालुकयातील देवळाली प्रवरा येथील अफसर गपूर शेख यांचे दोस्ती मटन शॉप हे दुकान शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर २४ रोजी अज्ञात चोरट्याने फोडले होते .याबाबत राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता . गुन्हा दाखल झाल्या नंतर राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सदर गुन्हाचा तपासासाठी चक्रे फिरवत दिनांक ९ नोव्हेंबर २४ रोजी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत संशयितरित्या फिरणाऱ्या १ ) ओम उमेश जनवेजा वय. १८ श्रीरामपूर २ ) कौसर निसार शेख वय. २६ श्रीरामपूर ३) आदम युसुफ शहा वय.२७ रा. वार्ड नं 2 श्रीरामपूर ४ ) तन्वीर सलीम खान वय. २१ श्रीरामपूर या चार आरोपीकडे कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी देवळाली प्रवरा येथील अफसर गपूर शेख यांचे दोस्ती मटन शॉप फोडल्याची कबुली दिली .
या चार हि आरोपीना अटक करून राहुरी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे त्यानंतर पुन्हा दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमाड राहुरी न्यायालयाने मंजूर केलेली आहे. सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे.सदर गुन्हाचा तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल यादव हे करीत आहेत.