राहुरी वेब प्रतिनिधी,२१ (शरद पाचारणे ) –
दिनांक २१ ऑक्टोबर २४ रोजी राहुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की राहुरी कॉलेज परिसरात एक इसम घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करविताना फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सदर नमूद बातमीची हकीगत गुन्हे शोध पथकास देऊन तात्काळ नमूद ठिकाणी रवाना केले असता सदर ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये नमूद इसम नामे आदित्य प्रकाश नारद वय 20 वर्ष रा.राहुरी बुद्रुक राहुरी अहिल्यानगर हा बेकायदेशीर रित्या लोखंडी पाते असलेले लाकडी मुठ असलेली कत्ती कब्जात बाळगताना मिळून आला आहे. त्यास राहुरी पोस्टे येथे आणून पोलीस कॉन्स्टेबल 24 53 गोवर्धन अंबादास कदम यांनी त्याचेविरुध्ध फिर्याद नोंदवली असून त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोस्टे येथे आर्म ऍक्ट कलम 4,25 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड हे करीत आहेत.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड,राहुल यादव,प्रमोद ढाकणे,सतीश कुराडे,नदीम शेख,अंकुश भोसले,गोवर्धन कदम यांनी केली .