शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत ताहाराबाद येथील अनेक कार्यकर्तेचा भाजपा प्रवेश

राहुरी वेब प्रतिनिधी,१७ (शरद पाचारणे ) –

राहुरी तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतचे माजी सदस्य व राहुरी तालुका विद्यमान चर्मकार संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण घनदाट यांच्या सह अनेक कार्यकर्तेनी माजी मंत्री तथा विद्यमान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांच्या उपस्तिथीत मुळा प्रवरा ऑफिस मध्ये आज दुपारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला . या प्रवेशाने तालुक्यातील वरच्या भागात राजकारणला कलाटणी मिळेल. आज या कार्यकत्यांनी प्रवेश केला ज्ञानेश्वर वरघुडे, सतिश विधाटे,संजय शिंदे, दैलत नालकर, दत्ता नालकर, रावसाहेब विधाटे, सुरज कदम, श्रीकांत लाहुडे, संदीप विधाटे, गणेश घनदाट, दिपक लाहुडे, मच्छिंद्र राधाकिसन शिंदे, रतन कदम, गणेश पांडुरंग शिंदे या सर्व कार्यकत्यांनी प्रवेश केला.या वेळी जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी सत्कार केला व माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी शुभेच्छा देऊन पुढील विकासात्मक कार्यास सहकार्यस मदत करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे ,ताहाराबाद माजी सरपंच नारायण झावरे ,माजी सरपंच ताहाराबाद सुनील औटी ,माजी उपसरपंच ताहाराबाद सुनील झावरे, भानुदास वाबळे, हरिभाऊ औटी ,विलास कुटे , बाबासाहेब किनकर, गणेश घनदाट, वैभव साबळे, बापू औटी, मयूर गवळी, सोमनाथ आहेर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *