सुरेश वाबळे हे सहकारी मल्टीस्टेट, पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीसाठी दिशादर्शक काम करत आहे – काकासाहेब कोयटे

राहुरी वेब प्रतिनिधी, १७ ( शरद पाचारणे ) –
सुरेश वाबळे हे सहकारी मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीला दिशादर्शक काम करत आहे. पतसंस्था मजबूतीकरणाचे अत्यंत गरजेचे काम मार्गी लागत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केले.प्रेरणामल्टीस्टेट पतसंस्थेच्या कोल्हार शाखा स्व मालीकी च्या जागेत उदघाटन समारंभात ते बोलत होते.काकासाहेब कोयटे पुढे म्हणाले, राज्यातील मल्टिस्टेट व पतसंस्था या दोन्हीही फेडरेशन चे नेतृत्व आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील व्यक्तींकडे आहे. दोन्हीही फेडरेशन आपापल्या क्षेत्रातील अत्यंत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. अडचणीतील पतसंस्थांना फेडरेशन मदतीचा हात देत आहे. आर्थिक संकटातून पतसंस्था वेळीच मदत मिळाल्याने बाहेर पडण्यासाठी निश्चितच मदत झाली. पतसंस्थेच्या ठेवीसाठी पतसंस्थांनी व्याजदराची स्पर्धा करु नये. जादा व्याजदराचे प्रलोभनांना ठेवीदारांनी बळी पडू नये. या बाबतीत कडक कायद्याची गरज आहे.प्रेरणा मल्टीस्टेट पतसंस्थांने सभासद, ठेवीदारांचा विश्वास संपादन केला.७१कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठला असून लवकरच पतसंस्था शंभर कोटींचा टप्पा गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी पतसंस्थेचे प्रगतीचा आढावा घेतला. कोल्हारच्या परिसरातील विकासासाठी पतसंस्था बांधील असून या बाबतीत पतसंस्था अधिक सकारात्मक कार्य करत राहिलं कार्यक्रम उपस्थित भाऊसाहेबनाना तरकसे, संजय शेठ शिंगवी चेअरमन व्यापारी पतसंस्था भाऊराव शिंदे व्हा चेअरमन व्यापारी पतसंस्था , साहेबराव दळे उपाध्यक्ष भगवती माता देवालय ट्रस्ट, दत्तात्रय राजभोज सरपंच भगवतीपुर ग्रामपंचायत, प्रकाश पा खर्डे उपसरपंच भगवतीपुर ग्रामपंचायत, अजितशेठ मोरे चेअरमन शिवधन पतसंस्था कोल्हार, सुनील खर्डे सुनील खर्डे ,दिलीप तात्या जगताप, सुरेश निबे, बापू तात्या कडस्कर, बी के खर्डे, भरत खर्डे, बाळासाहेब ठिगळे, संजय नालकर, संजय बनकर, राजेंद्र गाडे,साईनाथ पाटील खर्डे, स्थानिक सल्लागार बाबासाहेब मोहनराव खर्डे, धनंजय बाबासाहेब दळे, जनार्दन राघोजी आंबरेसर, नंदकुमार ज्ञानदेव दळे, कैलास भाऊसाहेब तरकसे, ऋषिकेश सुनील खांदे, मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन सुजित वाबळे व्हा . चेअरमन लांबे सर संचालक विष्णूपंत वरपे जालिंदर काळे सह संस्थेचे सभासद ठेवीदार खातेदार,व पत्रकार इतर सहकार संस्थाचे पदाधिकारी हजर होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *