राहुरी वेब प्रतिनिधी,१५ ( शरद पाचारणे ) –
ग्रामीण भागात परिवर्तनाचे आदर्श माँडेल प्रेरणा ने उभारले आहे.ग्रामीण भागात अशी रोल माँडेल अधिक प्रमाणात विकसित झाली पाहिजेत असे प्रतिपादन केंद्रीय सहकार सचिव डॉ. आशिष भूताणी साहेब यांनी व्यक्त केले.प्रेरणा विकास, प्रेरणा पतसंस्था व प्रेरणा मल्टिस्टेट यांच्या कार्याची तपशीलवार माहिती घेतल्यानंतर प्रेरणाच्या वतीने त्यांचा संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांच्या हस्ते गुहा येथे विकास संस्थेत सत्कार झाला. सत्काराच्या उत्तरादाखल भाषणात डॉ. भूताणी पुढे म्हणाले, प्रेरणा विकास संस्था गावातील विकासाचा आधार बनली आहे. शेती,शेतकरी यांच्या विकासासाठी विकास संस्था सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याच धर्तीवर विकास सेवा संस्थानी काम केले पाहिजे. पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या त बचतीची सवय वाढवली.समाजातील पैसा समाजातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदु बनवला.समाजातील व्यक्तींची पत वाढवली.हे विकासाचे काम प्रामाणिक पणा व पारदर्शकता ,समाजहिताची बांधिलकी या विश्वासावर उभे आहे. आपण हे काम पाहून खूपच प्रभावित झालो आहोत.”संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांनी प्रेरणा उद्योग समुहाद्वारे तिन्हीही संस्थांच्या प्रगतीचा आलेख सादर केला.जिल्हा उपनिबंधक अ.नगर गणेश पुरी साहेब, नागेबाबा मल्टिस्टेट चे संस्थापक चेअरमन कडु भाऊ काळे प्रेरणा मल्टिस्टेट चेअरमन सुजित वाबळे प्रेरणा पतसंस्था व्हा.चेअरमन मच्छिंद्र हुरुळे प्रेरणा सोसायटी व्हा.चेअरमन अशोक उर्हे संचालक शिवाजी उर्हे अशोक सौदागर संचालक सह जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे रविंद्र हिवाळे, महेश सिनारे आदी यावेळी हजर होते.