राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) –
राहुरी फॅक्टरी येथील नाभिक समाज संघटनेच्यावतीने दिनांक ३० ऑगस्ट रोजी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय येथे अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस नाभिक समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव,शिवचरित्रकार अभिजित आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. गंगाधर बाबा छात्रालयातील विद्यार्थ्यांना मिष्ठभोजन नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी राहुरी फॅक्टरी नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षपदी ऋषीकेश राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत निर्णय झाला.
प्रसंगी प्रकाश सपकाळ,जेष्ठ मार्गदर्शक चांगदेव पवळे,उद्धव राऊत,कुशीनाथ राऊत,अभिजित आहेर,सचिन वाघमारे,तुषार राऊत,आप्पा थोरात,प्रसाद वाघमारे,विजय सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,सोमनाथ आहेर,सुभाष हुडे,सुरेश कोरडे,अनिल वाघमारे,सोनू आहेर,महेश बिडवे,अभि राऊत,वैभव राऊत,संदिप वाकचौरे,बबलू गायकवाड,आप्पासाहेब हुडे, आदींसह नाभीक समाज बांधव उपस्थित होते.