बेलापूर खुर्द येथे लिंगगुणोत्तर जनजागृती मोहीम

श्रीरामपूर वेब प्रतिनिधी : लिंगगुणोत्तर वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी तसेच या संदर्भातील कायदेशीर तरतुदींची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी मंगळवारी (दि. 27) श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भेट दिली.यावेळी प्रांताधिकारी श्री. सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) श्री. भवर, गटविकास अधिकारी श्री. मस्के, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) श्रीमती शिंदे आदी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत बेलापूर खुर्दचे आजी-माजी पदाधिकारी, विविध बचत गटांच्या महिला सदस्य, तालुक्यातील पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मुलींच्या जन्माचे स्वागत, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधक कायदे, तसेच समाजाने सकारात्मक मानसिकता स्वीकारण्याचे आवाहन केले. लिंगभेद नष्ट करून समतावादी समाज घडविण्यासाठी प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान महिलांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती देत जनजागृतीवर भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *