राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) – राहुरी तालुक्यातील गावांसाठी निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी आग्रही मागणी जिल्हा बँकेचे संचालक अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
कर्डिले यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, निळवंडे धरणाचा उजवा पाट राहुरी तालुक्यातून जातो त्यामध्ये निंभेरे, तुळापुर, कानडगाव, तांदुळनेर, सोनगाव सात्रळ, धानोरे, तांभेरे, वडनेर, कनगर, चिचंविहिरे, गुहा, गणेगाव आदि गावांना मोठ्या प्रमाणात पाटाच्या पाण्याचा फायदा होतो मागील वर्षी आपल्या माध्यमातून सर्व लाभार्थी गावातील ओढ्यावर असणारे बंधारे भरून वाहिले होते त्यामुळे आजपर्यंत शेतीसाठी पाणी मिळाले त्यामुळे शेतकऱ्याना मोठा फायदा झाला म्हणून या वर्षी आपण निळवंडे पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याच्या सुचना कराव्यात व वरील गावातील सर्व बंधारे भरून देण्याबाबत आदेश करावेत अशी विनंती केली आहे.