राहुरी वेब प्रतिनिधी,२३ (शरद पाचारणे ): शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त राहुरी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बाळासाहेबांच्या विचारांचा जागर करत शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेला अधिक बळ देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी शिवसेना संघटक पै. रावसाहेब खेवरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठीचे लढे, अन्यायाविरोधातील निर्भीड भूमिका आणि ठाम हिंदुत्ववादी विचार यांचा आढावा घेतला.
शिवसेना तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड केली नाही. शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून मराठी अस्मितेची आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांची चळवळ आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेबांचे विचार अधिक मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी डॉ. संजय म्हसे, कैलास शेळके, भरत धोत्रे, विलास ढोकणे, पोपट शिरसाठ, पोपटराव शेळके, दत्तात्रय शिंदे, ओंकार खेवरे, सतीश माने, शहाजी वराळे, अमित भागवत, सुरज पोटे, अमोल पवार यांच्यासह शिवसैनिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जय भवानी, जय शिवाजी” व “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.