संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रसादनगर–गुंजाळ नाकाबाह्य वळण रस्त्याची पाहणी

देवळाली प्रवरा (ता. राहुरी) :
प्रसादनगर परिसरातील जड वाहतूक अन्यत्र वळविण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर ते गुंजाळ नाका (चिंचविहीरे शिव रस्ता) खुला करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी राहुरी तहसीलदारांकडे निवेदन दिले होते. तहसीलदारांच्या आदेशानुसार आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या शिव रस्त्याची सर्कल पाहणी करण्यात आली.
देवळाली प्रवरा मंडळ अधिकारी मंडलिक व तलाठी गरकळ यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब ढूस व स्थानिक शेतकऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे काँग्रेस गटनेते तुकाराम ऊर्फ दासू पठारे, नगरसेवक शरद वाळुंज, प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख चंद्रकांत कराळे, शहर प्रमुख प्रकाश वाकळे, संपर्क प्रमुख गणेश भालके, स्थानिक शेतकरी व उद्योजक विष्णुपंत गिते, शिवाजी गिते, देशमुख आदी उपस्थित होते.हा रस्ता खुला झाल्यास प्रसादनगर भागातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *