गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्र मंडळाचा गणपती विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने संपन्न

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)७ सप्टेंबर : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गणपती विसर्जन सोहळा पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. गावकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, भजन-कीर्तनाच्या स्वरात आणि वारकरी परंपरेनुसार गणरायाला निरोप दिला. या विसर्जन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने मंगलमय झाला होता.

शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. चैतन्य वारकरी शिक्षण संस्था, जोगेश्वरी आखाडा येथील ह.भ.प. गोपीनाथ महाराज वरपे यांच्या उपस्थितीत संस्थेतील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंग आणि भजनाच्या तालावर मिरवणूक काढली. गोटुंबे आखाडा येथील भजनी मंडळही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. लहान मुलांपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामुळे सोहळ्याला पारंपरिक आणि उत्साहाचे स्वरूप आले.

या सोहळ्यासाठी डॉ. अण्णासाहेब बाचकर, जालिंदर गडधे, ह.भ.प. आदिनाथ महाराज दवणे, पत्रकार रमेश खेमनर, संतोष कराळे, सुरेंद्र आदमाने, राहुल बाचकर, अंकुश दवणे, तेजस बाचकर, आकाश डहाळे, अक्षय डहाळे, राजन सुसे, तुषार सुसे, आदित्य कराळे, कार्तिक बाचकर, सोन्याबापु बाचकर, बापू होडगर, पंकज पवार, संजय धोत्रे, सिद्धार्थ सुसे, चैतन्य सुसे, देवेंद्र गिते, महेंद्र मराठे, रसूल शेख, आकाश खेमनर, अजिंक्य आदमाने, सचिन बाचकर यांसारखे अनेक मान्यवर आणि गणेशभक्त उपस्थित होते. तसेच, रंजना दवणे, सविता गडधे, अनिता बाचकर, संगीता सुसे, रेणुका सुसे, सुनीता सुसे, शीतल दवणे, मंगल डहाळे, सुमन काळे, शोभा निमसे या महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.

गावकऱ्यांच्या सामूहिक सहभागातून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजन-कीर्तनांच्या सुरावटींनी सजलेल्या या मिरवणुकीने पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले. भक्ती आणि एकतेचे दर्शन घडवणारा हा सोहळा भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *