राहूरी वेब प्रतिनिधी, १६ (शरद पाचारणे): – श्री क्षेत्र लक्ष्मीनगर, नवीपेठ, राहूरी येथे श्री येडेश्वरी माता यात्रा उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत मंगळवार, १७ जून २०२५ रोजी भव्य छबिना मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ५४ व्या वर्षांत पदार्पण करत असलेल्या या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
* सोमवार, १६ जून २०२५: जागरण गोंधळ
* मंगळवार, १७ जून २०२५:
* सकाळी ७:०० वा.: देवीचा अभिषेक
* सकाळी ९:३० वा.: कावडीची भव्य मिरवणूक
* सकाळी ११:०० ते ४:०० वा.: महाप्रसाद कार्यक्रम
* दुपारी ४:०० ते ४:३० वा.: हळदी कार्यक्रम
* दुपारी ४:४५ वा.: छबिना मिरवणूक
* सायं. ६:०० वा.: परड्या भरण्याचा कार्यक्रम
* रात्री ९:०० वा.: आरती गाण्याचा कार्यक्रम
* देवांचे भक्ती गीत
या सोहळ्याचे आयोजक गुरु आई सौ. रंगुबाई एकनाथ जगधने, श्री येडेश्वरी यात्रा उत्सव कमिटी, राहूरी
सेवेकरी प्रशांत हौसेनात जगधने यांनी केले आहे.
लक्ष्मीनगर व सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करत आहेत.
स्थळ: लक्ष्मीनगर, नवीपेठ, राहूरी, जि. अहमदनगर. या कार्यक्रमाचा सर्व भावी भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.