सुरेखा माकोणे, आरती फुलारे यांना “अहिल्यादेवी होळकर” पुरस्कार प्रदान

राहुरी वेब प्रतिनिधी ,०९ ( शरद पाचारणे ) –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक ३१ मे रोजी सन २०२४ -२५ या वर्षात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरीय शैक्षणिक क्षेत्रात श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालय केंदळ बुद्रुक येथील शिक्षिका सौ.सुरेखा बाळासाहेब माकोणे ( जाधव सुरेखा केशव) यांना व सामाजिक क्षेत्रात सौ.आरती सोमनाथ फुलारे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मा.ग्रामसेविका भिसे मॅडम, उपसरपंच विजयकुमार चव्हाण यांच्या शुभ हस्ते प्रदान  करण्यात आले. याप्रसंगी सरपंच गोविंद जाधव,अण्णासाहेब देवरे, लोंढे नानासाहेब,ताराबाई, लोंढे,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेविका भिसे मॅडम यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या महान सामाजिक, कल्याणकारी कार्याविषयी माहिती दिली. आजच्या महिलांनीही त्यांचा आदर्श घेत कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यावेळी त्यांनी या महिलांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले  व त्यांनी असेच कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या. विजयकुमार चव्हाण यांनीही अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती तसेच सर्व महिलांना त्यांनी पुण्यतिथीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपल्या सुरेखा माकोणे व आरती फुलारे यांनी त्यांना प्रदान केलेल्या पुरस्काराबद्दल सर्वांचे आभार मानले. आपल्या या यशामागे
श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालय केंदळ बुद्रुक संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ग्रामस्थ तसेच पती बाळासाहेब माकोणे व आपल्या पूर्ण कुटुंब, मित्रपरिवार यांचा महत्वपूर्ण वाटा आहे असे त्यांनी सांगितले. व सर्वांचे  मनापासून आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *