राजूभाऊ शेटेंच्या पाठपुराव्यामुळे चिमुकलीच्या उपचारासाठी निधी उपलब्ध 

राहुरी वेब प्रतिनिधी,२६ (शरद पाचारणे )- 

राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील कु .स्वरा प्रदीप हारदे या चिमुकलीच्या हृदयरोग व आजारावरील उपचारासाठी खर्च भागवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते राजूभाऊ शेटे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे एक लाख रुपये आर्थिक निधी मंजूर झाला आहे.

 राहुरी येथील  तुळापूर येथील कु. स्वरा प्रदीप हारदे ही के.एम हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी उपचार घेत असून तिच्या हृदयरोग व आजारावरील उपचाराचा खर्च भागवण्यासाठी तिची आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने राजूभाऊ शेटे यांच्या विशेष प्रयत्नातून रुग्णास १ लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांनी मदत करून दिली आहे.

त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे हारदे कुटुंबियांकडून राजूभाऊ शेटे यांचे आभार मानण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *