योगा समुहाकडुन अनिल निकम यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा

राहुरी वेब प्रतिनिधी,२४ ( शरद पाचारणे )-

राहुरी योग समुहाकडुन नियमितपणे राहुरी महाविद्यालय येथे १०८ सूर्यनमस्कार घातले जातात.आज समुहातील एक सदस्य अनिल निकम यांचा वाढदिवस असल्याने त्याचे औचित्य साधून हार,बुके,शाल,श्रीफळ व केक या पारंपरिक पध्दतीला फाटा देऊन प्रितेश बोरा, माऊली पोपळघट,रवी दरक,सागर साळवे,डॉ.कड,गिरीश शेठ सुराणा,प्रा.अनिरूध्द जाधव,राजु मुंडलीक,परेश चुत्तर,व अनिल निकम यांनी प्रत्येकी २१७ सूर्य नमस्कार घालून पर्यावरण, आरोग्य, सांस्कृतिक व व्यक्तीमत्व विकास स्नेही अशा नावीन्यपूर्ण शुभेच्छा देऊन मित्राचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करून संस्मरणीय केला आहे.     
आजच्या युगात तरुण पिढीने वाढदिवस साजरा करतांना वरीलप्रमाणे आरोग्य स्नेही व व्यक्तीमत्व विकासाला चालना देणा-या पध्दतीचा अवलंब करून समाजापुढे आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे.राहुरी योग समुहाचा वरील उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *