राहुरी वेब प्रतिनिधी,२१ (शरद पाचारणे)-
“तू आमचे पोलिसांना रिपोर्ट का देतो” असे म्हणत लोखंडी रॉड व लाकडी काठीने गुहापाट येथील शेतकरी विजय सुधाकर बोरुडे यांना मारहाण केल्याची घटना दिनांक १८ मे रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास गुहापाट या ठिकाणी घडली.
याबाबत विजय सुधाकर बोरुडे रा.गुहापाट यांनी राहुरी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रविवार दिनांक १८ मे रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास विजय बोरुडे हे दूध केंद्रावर दूध घालून घरी निघाले असता रोड मध्ये त्यांना पंकज रमेश साळवे हा भेटला त्याच्यासोबत असणारे त्याचे मित्र विकास बबन थोरात, नितीन संजय ओहोळ असे तिघांनी विजय बोरुडे यांना म्हटले की “तू आमचे पोलिसांना रिपोर्ट का देतो”
यावर विजय बोरुडे यांनी मी तुमचा कधी पोलिसांना रिपोर्ट दिला आहे तुम्ही मला शिवीगाळ करू नका असे म्हणाल्याचा राग आल्याने पंकज साळवे यांनी त्याच्या हातातील लोखंडी रॉड व विकास बबन थोरात, नितीन संजय ओहोळ यांच्या हातातील लाकडी काठीने मारहाण केली. त्यावेळी मोठ्याने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले लोक जमा झाल्याचे पाहता ते तिघे पळून गेले . याबाबत विजय सुधाकर बोरुडे रा.गुहापाट यांच्या फिर्यादीवरून पंकज रमेश साळवे, विकास बबन थोरात, नितीन संजय ओहोळ राहणार गुहापाट तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.