“लाइफ इन हॉस्पिटलचे” डॉ.धनंजय पानसंबळ डॉक्टरेट पदवीने सन्मानित

राहुरी वेब प्रतिनिधी,३० (शरद पाचारणे )-

राहुरी येथील युवा उद्योजक डॉ .श्री धनंजय पानसंबळ यांनी ग्रामीण भागातील रुग्णाची अडचण लक्षात घेत, राहुरी शहरामध्ये सर्वसामान्यांच्या हितासाठी आरोग्याचा नवा अध्याय हे ब्रीदवाक्य घेऊन अद्यायावत,प्रशस्त व सर्व सोयीनियुक्त २४ तास रुग्ण सेवेसाठी तत्पर असलेले एकमेव असे “लाईफ इन हॉस्पिटलची” उभारणी केली .त्यामध्ये गोरगरीब रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रिया, विविध रोगांवरील उपचार उपलब्द करून दिले .किडनी डायलेसिस करण्यासाठी शहराच्या बाहेर जावे लागत होते ,रुग्णांची ही होणारी परवड थांबण्यासाठी डॉ श्री धनंजय पानसंबळ यांनी राहुरी शहरांमध्ये २४ तास निरंतर सेवा देणार “लाईफ इन हॉस्पिटल” मल्हारवाडी रोड येथे सुरू करून महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना  मार्फत केल्या जाणारे सर्व उपचार राहुरी मध्येच सुरू करून रुग्णांची गैरसोय दूर केली.आज मितीला या हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे 20 ते 22 डायलिसिस रोज मोफत केले जातात.तसेच अनेक वर्षांपासून ग्रामीण व दुर्गम  भागात सर्वरोग निदान शिबीर घेऊन सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय मार्गदर्शन करून जनतेची सेवा करण्याचे काम डॉ श्री धनंजय पानसंबळ यांनी केले
      वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना 07/08 /2023 रोजी दिल्ली येथे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्या हस्ते “राष्ट्रीय समाज भूषण 2023” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    सामाजिक कामात कायम पुढाकार घेऊन समाजसेवा करणारे डॉ श्री धनंजय शिवाजीराव पानसंबळ याना दि 26/ 04 /2025 रोजी “एशिया इंटरनॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी” ( महाराष्ट्र ,गोवा,कर्नाटक राज्य) यांच्याकडून बंगलोर येथे मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरेट ही पदवी बहाल करून सन्मानित करण्यात आले
डॉ श्री पानसंबळ यांचे विविध क्षत्राच्या मान्यवरांकडून अभिनंदन होत असून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *