श्रीरामपूर वेब प्रतिनिधी शरद पाचारणे:
श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न प्रकरणातील गेल्या एक वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करत आरोपीस श्रीरामपूर शहरातून अटक केली.
दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ३५४/२०२५ अन्वये दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी संकेत सर्जेराव गायकवाड (वय २३, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हा श्रीरामपूर शहरात आलेला आहे.
या माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयातील पथकाला तात्काळ शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तांत्रिक विश्लेषण व खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी संकेत गायकवाड यास श्रीरामपूर शहरातून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.