जीवन गुलदगड यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अहिल्यानगर ओबीसी विभागाच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड

राहुरी वेब प्रतिनिधी ,०४ (शरद पाचारणे ) :-  अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर  ओबीसी विभागाच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी जीवन रघुनाथ गुलदगड यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

या निवडीवेळी राज राजापूरकर (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) यांच्यासह आसिफ खलिफे, प्रकाश चव्हाण, सुनील गुलदगड, सलीम बागवान, भागवत झडे, महेश उदावंत, आनंद गुलदगड, शिंदे सर, नारायण फुलसैंदर, संकेत दुधाडे, अमोल गुलदगड, सत्तार भाई शेख, अमोल वाघचौरे, बबन गुलदगड आणि सतीश मेहेत्रे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जीवन गुलदगड यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील ओबीसी विभागात उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *