राहुरी वेब प्रतिनिधी,१९ ( शरद पाचारणे ) – राहुरी वेब
भीम आर्मी व अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना. तथा दिवंगत बंन्टीभाई बिवाल. मित्रपरिवार.च्या वतीने सालाबादप्रमाणे
डॉक्टर .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली .
रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता 151 तोफांची सलामी दिली तर सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम.त्या नंतर राहुरी येथील मिशन शाळेतील राजनूर वसतिगृहातील अनाथ मुलांना पूर्ण गणवेश, शालेय उपयोगितेच्या साहित्य वाटप करण्यात आले त्यानंतर अनाथ मुलांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले .
मनगरवर दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सवाद्य शोभा यात्रा काढण्यात आली होती या मध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिक , महिला भंगिनी यांनी सहभाग घेतलं होतं.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल,डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती,2025 चे समिती अध्यक्ष संदीप सरोदे,उपाध्यक्ष निखिल बिवाल,खजिनदार प्रदीप गायकवाड,सचिव सुरेश उपदे ,लाल्ला शेख,कार्याध्यक्ष विशाल जोगदंड यांनी केले होते