नवरात्रीच्या शुभेच्छाचे फ्लेक्स अज्ञात व्यक्तीने फाडले

राहुरी वेब प्रतिनिधी ,६ (शरद पाचारणे ) –
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ व सोसायटी चौकात नवराञ उत्सवानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याची घटना घडली आहे.
देवळाली बाजार तळ व सोसायटी डेपो येथे माजी खा.सदाशिव लोखंडे , आ.लहु कानडे, शांती चौक मित्र मंडळाचे दीपक त्रिभुवन यांच्या समर्थकांनी नवरात्रीच्या शुभेच्छाचे फ्लेक्स लावलेले होते.शनिवारी मध्यरात्री अथवा पहाटे दरम्यान अज्ञात व्यक्तीने फ्लेक्स फाडले आहेत. या घटनेमुळे लोखंडे, कानडे व त्रिभुवन यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.पोलीस प्रशासनाने गावातील सीसीटीव्ही तपासणी करून फ्लेक्स फाडणाऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली. गेल्या दोन वर्षापूर्वी देवळाळी प्रवरात बऱ्याच दुकानांवरील फ्लेक्स फाडले गेले होते.आत थेट नेत्यांचे फ्लेक्स फाडल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *